fbpx

टी एन ए आय, महाराष्ट्र शाखा

टी एन ए आय, महाराष्ट्र शाखा

ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (टी एन ए आय), महाराष्ट्र शाखा हि सर्वात जुनी आणि शंभर वर्षाहून अधिक काळ सतत कार्यरत असलेली शाखा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिचे मुख्य कार्यालय मुंबईतील विविध रुग्णालयात होते.

टी एन ए आय ची स्थापना जे जे रुग्णालयात झाली होती (१९०८). त्यामुळे जे जे रुग्णालयातच पुढे मुंबई सिटी ब्रांच व महाराष्ट्र ब्रांच ह्यांची कार्यालये होती. महाराष्ट्र शाखेचे कार्यालय काही काळ नागपूर येथेही होते.

पूर्णवेळ कार्यालय नसल्यामुळे ज्या ठिकाणी अध्यक्ष व सेक्रेटरी असतील तिथे कार्यालय असायचे. मुंबई शाखेचे कार्यालय पुढे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये व त्यानंतर के ई एम हॉस्पिटल मध्ये दीर्घ काळ होते. तसेच महाराष्ट्र शाखेचे कार्यालय कुपर हॉस्पिटल मधेही काही काळ होते. महाराष्ट्र शाखेचे पूर्ण वेळ व कायमस्वरूपी कार्यालय असावे ह्यासाठी १९८० पासून प्रयत्न सुरु होते व त्यासाठी काही निधीची तरतूदही केली होती.

top